Alandi : आळंदी येथील देहूफाटा चौकात नवीन सिग्नल उभारले

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) येथील देहूफाटा चौकात (आळंदी- पुणे, आळंदी-देहू रस्त्यावर) प्रथमच नव्याने सिग्नलची उभारणी करण्यात आली आहे.

Baramati News : ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून टाकला दरोडा

आळंदीतील वाहतुकी संदर्भातील समस्या जाणत, जनहिता करिता दिघी आळंदी वाहतूक विभागाचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी वेळोवेळी त्या संदर्भात संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार करत त्याचा पाठपुरावा केला.

तसेच, आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सुद्धा या 8 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी त्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. व अनेक पक्ष , संघटना , माजी नगरसेवक यांनी सुध्दा त्या संदर्भात मागणी केली होती.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्या आळंदी शहरातील विविध योगदानाबाबत इंद्रायणी सेवा फाउंडेशने  त्यांचे  अभिनंदन केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.