Mobile theft: आता मोबाईल चोरी अशीही…

एमपीसी न्यूज – फोनवर बोलत पायी चालत जाणाऱ्याचा मोबाईल चोरला, पर्स मधून मोबाईल चोरला, कारमधूम, घरातून मोबाईल चोरीला असे अनेक मोबाईल चोरीचे प्रकार तुम्ही बघितले किंवा एकले असतील.

मात्र भोसरी येथे चक्क चालु दुचाकीला लाथा मारून गाडीसह महिलेला खाली पाडले व त्या गोंधळात चोरटे मोबाईल घेऊन पसार झाले. हा प्रकार शुक्रवारी (दि.11) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पुणे- नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडला.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कामावरून घरी जात होत्या. यावेळी फिर्यादी यांच्या पाठी मागून आरोपी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या चालू गाडीला पायाने लाथा मारण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या प्रकाराने फिर्यादी या गाडीसह खाली पडल्या.

उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याने 2 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, बिल्डरसह ठेकेदारावर गुन्हा दाखल

यावेळी फिर्यादी यांचा रस्त्यावर पडलेला 10 हजार रुपयांचा मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले. यावरून भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे नागरिकांनी अजून किती सावधानता बाळगायची, अशा घटनेत कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असे सवाल उपस्थित होत आहेत.

पोलीस यंत्रणांनी शहरातील मोबाईल व चेनस्नॅचींग प्रकरणातील आरोपींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे अन्यथा किरकोळ वाटणाऱ्या चोऱ्या गंभीर प्रकरमात रुपांतरीत होण्यास वेळ लागणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.