Bhosari : बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून खरेदी केला 45 हजारांचा मोबाईल

एमपीसी न्यूज – मोबाईलच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलेने 45 हजारांचा मोबाईल खरेदी केला. त्याचे पैसे देताना तिने बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून दुकानदाराची फसवणूक केली.(Bhosari)  ही घटना 13 एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास दिघी रोड, भोसरी येथे घडली.

महेश हिरामण शिंदे (वय 35, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : निगडी प्राधिकरण येथे पाच लाखांची घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका मोबाईलच्या दुकानात काम करतात. 13 एप्रिल रोजी एक महिला रात्री दहा वाजता ग्राहक बनून दुकानात आली. (Bhosari) तिने वन प्लस कंपनीचा 45 हजारांचा मोबाईल फोन खरेदी केला. त्याचे पैसे तिने दोन टप्प्यात दिले. सुरुवातीला तिने 20 हजार रुपयांचे तिच्या मोबाईल मध्ये अॅप्लिकेशन च्या मदतीने बनवलेले ट्रॅन्झॅक्शन दाखवले. त्यानंतर 25 हजार रुपयांचे एक बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून पैसे दिल्याचा बहाणा करत फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.