Nigdi : निगडी प्राधिकरण येथे पाच लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण (Nigdi) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून पाच लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi : एम.आय.टी. महाविद्यालयात स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन विषयावर कार्यशाळेचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच ते 17 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या (Nigdi) घराच्या टेरेसचा दरवाजाचा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, कॅमेरा, अॅपल मॅकबुल प्रो 13 लॅपटॉप आणि घड्याळ असा एकूण पाच लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.