Alandi : एम.आय.टी. महाविद्यालयात स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन विषयावर कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातिल इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलने व स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन सेल यांनी 17 एप्रिल रोजी स्टार्ट-अप’ सुरु करताना कोणत्या कायदेशीर आणि नैतिक गोष्टी केल्या पाहिजेत यावर एक दिवसीय कार्यशाळेचे केले. 

या एक दिवसीय कार्यशाळेला डॉ.अरविंद शाळीग्राम (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ IIC अध्यक्ष व रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ) यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी स्टार्ट-अप नोंदणीसाठी प्रारंभिक तयारी बद्दल विस्तृत माहिती दिली. स्टार्ट-अपसाठी कायदेशीर नैतिक पावले कशी घ्यावी? हे सांगितले.

या प्रसंगी महाविद्यालयातील इनोव्हेशन सेल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. स्टार्ट-अप व इनोव्हेशन सेल लॅबच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.बी.वाफरे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप बद्दल अर्थपूर्ण समज प्रदान करणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे.

कार्यशाळा विद्यार्थी समुदायाला स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन मधील आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि देशाला आवश्यक असलेल्या पुढच्या पिढीच्या (Alandi) नेत्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी अधिक अनुकूल तयार करणे या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.

Pimpri : अनधिकृत होर्डिंगकडे महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – श्रीरंग बारणे

या कार्यशाळेला उपप्राचार्य प्रा. अक्षदा कुलकर्णी, डॉ.मानसी अतितकर आणि विविध विभागांचे प्रमुख येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन सेलचे प्रमुख आणि आयआयसी संयोजक प्रा.अभिजित नेटके यांनी केले. डॉ. अर्चना आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व पाहुण्यांचा परिचय प्रा.आकांशा लांडगे यांनी केला.

आभार प्रदर्शन प्रा.श्रीराम कारगावकर यांनी केले. या कार्यक्रमात प्रा.अमोल माने, प्रा.संजय गुंजाळ, प्रा.वसनात करमड, प्रा.कविता महाजन, प्रा.प्रिती भारंबे, प्रा.पल्लवी बोंगाणे यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेमध्ये सर्व विद्या शाखेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.