Pimpri : अनधिकृत होर्डिंगकडे महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डिंग आहेत. त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. (Pimpri) अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी निविदा काढण्यात आली. पण, न्यायालयाचे कारण पुढे करून महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील सगळे अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे. ज्या होर्डिंगला परवानगी आहे त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना केली.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की,  वादळी वा-यासह होणा-या  पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाला थाबलेल्या व्यक्तीच्या अंगावर  किवळे येथे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.(Pimpri) यात मृत व जखमी झालेले व्यक्ती हे सर्वसाधारण कुटुंबातील आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्यशासनाने मदत केली आहे. पण, महापालिकेने ही काही मदत करावी.

Pune : सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह केली 20 वाहनांची तोडफोड; चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

शहरात अनाधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे.  शहराच्या सर्व  भागात होर्डिंग दिसतात. त्यातील जवळपास 2200 होर्डिंग हे अनाधिकृत आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरात असे होर्डिंग उभारले जात आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यामध्ये प्रशासन व अनाधिकृत  होर्डिंग मालक याचे आर्थिक देणेघेणे असल्याचे दिसून येते, यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.

शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी निविदा काढण्यात आली होते. केवळ न्यायालयाचे कारण पुढे करून महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील सगळे अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे. ज्या होर्डिंगला परवानगी आहे त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. किवळे येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. (Pimpri) जखमींचा पूर्ण खर्च महापालिकेने करावा. यापुढे महापालिकेने मुख्य चौकांमध्ये अपघात होईल अथवा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी होर्डिंगला परवानगी देऊ नये, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.