Nigdi : मॉर्डन प्री -प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज – निगडी यमुनानगर (Nigdi) येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन प्री -प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बुधवारी (दि.5) गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मुलांना आपल्या संस्कृतीचे व परंपरेचे महत्व कळावे म्हणून ही संकल्पना शाळेचे चेअरमन प्रो. शामकांत देशमुख व यशवंत कुलकर्णी यांनी सुचविली.

या कार्यक्रमाची सुरुवात व्यासांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली . प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरु ही त्याची आई असते. ती त्याची दैवतही असते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्युनिअर के.जी. व सिनीअर के.जी. च्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई आणि वडिलांची पाय धुऊन त्यांना नारळ आणि फूल देऊन त्यांना वंदन केले.

Maharashtra : रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांचा अल्टीमेटम

शाळेचे व्हिजिटर डॉ. प्रो. अतुल फाटक व मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे व सहकार्यवाह ज्योस्त्ना एकबोटे यांनी मुलांचे कौतुक केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका (Nigdi) तृप्ती वंजारे ह्यांनी या कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.