PMPML : लोहगाव व खराडीकरांना दिलासा; पीएमपीएमएलकडून दोन बसमार्गांचा विस्तार

एमपीसी न्यूज : पीएमपीएमएलतर्फे दोन (PMPML) मार्गांचा विस्तार केला आहे, ज्याचा फायदा लोहगाव खराडी परिसरातील नागरिकांसाठी होणार आहे. हे मार्ग कालपासून (गुरुवार) सुरु करण्यात आले आहेत.

यामध्ये बसमार्ग क्र. 179 हडपसर ते विमाननगर या मार्गाचा विस्तार लोहगावपर्यंत व बसमार्ग क्र. 225 हिंजवडी माण फेज 3 ते विमाननगर या मार्गाचा विस्तार खराडी गावपर्यंत होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. 179 हडपसर ते विमाननगर या मार्गाचा विस्तार लोहगावपर्यंत व आयटी कंपन्यामध्ये कामकाज करणाऱ्या कामगारांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. 225,हिंजवडी माण फेज 3 ते विमाननगर या मार्गाचा विस्तार खराडीगावपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे लोहगाव व खराडीगाव येथून प्रवास करणाऱ्या प्रवासी यांना दिलासा मिळाला आहे.

Nigdi : मॉर्डन प्री -प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी केली गुरुपौर्णिमा साजरी

बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे – PMPML

  •  मार्ग क्रमांक 179 – हडपसर ते लोहगांव.
  •  मार्गे – सिंबायोसिस कॉलेज, विमान नगर, लोहगाव विमानतळ, केंद्रीय विद्यालय, बर्मासेल.
  •  बस संख्या – 1.
  •  वारंवारिता – 2 तास 30 मिनिटे.
  •  मार्ग क्रमांक 225 – हिंजवडी माण फेज 3 ते खराडीगाव.
  •  मार्गे – विमाननगर कॉर्नर, चंदननगर, रक्षकनगर, आयटी टॉवर, खराडीगांव.
  •  बस संख्या – 2
  •  वारंवारिता – 2 तास.

या बस सेवेचा लाभ प्रवासी नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग व ज्येष्ठ नागरीक यांनी घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.