Nigdi :  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाची सांगता

एमपीसी न्यूज  – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या (Nigdi ) विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानकाशेजारील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाची सांगता झाली.

यावेळी माजी नगरसदस्य मारूती भापकर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक ,जेष्ठ नेते भाऊसाहेब आडगळे, संदीपान झोंबाडे, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष अण्णासाहेब कसबे,सचिव नितीन घोलप, कार्याध्यक्ष सचिन दुबळे, मनोज तोरडमल, नाना कसबे, किसन नेटके,भगवान शिंदे, युवराज दाखले, अरुण जोगदंड, अमित गोरखे ,सतीश भवाळ, दत्तू चव्हाण, डी. पी. खंडागळे, संजय ससाणे, अनिल सौदंडे, रामदास कांबळे, शिवाजीराव साळवे, रामभाऊ पात्रे, अण्णा लोखंडे, रवींद्र खिलारे, विठ्ठल कळसे, गणेश साठे,

संजय धुतडमल,स्वप्नील जाधव, अक्षय उदगीरे, यादव खिलारे,मनोज पवार,शंकर खुडे, शिवाजी खडसे,अनिल तांबे, अनिल गायकवाड,महादेव वैरागर, मोहन भिसे, बालाजी गवारे, विजय तावरे, संतोष इंगळे, वसंत वावरे, नाना पाटोळे, स्वप्निल वाघमारे, बाबा रसाळ, मयूर घोलप, प्रभाकर वैराळ, दीपक लोखंडे, किशोर हातागळे, अविनाश साळवे, बाजीराव मोरे, कैलास वारके, मधुकर रोकडे, गणेश अवघडे, नाना पाटोळे, शेषनारायण पवार, सामाजिक कार्यकर्त्या झुंबरताई शिंदे ,केशरताई लांडगे, मीना कांबळे, सविता आव्हाड, मीना खिलारे , कुसुम कदम, मीरा अल्लाड, अनिता गायकवाड, जनाबाई वैरागे, विनू ताई राजगुरू, भारती नुरी, मंगल रूपटक्के, आशाताई शहाणे आदी उपस्थित होत्या.

महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवशी प्रबोधन पर्वात महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या अनेक कलाकारांनी आपापल्या कलेच्या माध्यमातून अण्णा भाऊंचे विचार आणि साहित्य नागरिकांना पर्यंत पोहचविले. या प्रबोधन पर्वातील अखेरच्या दिवसाच्या सुरवातीस किसन गायकवाड, विजय साळवे, उत्तम बिरगणे यांच्या पारंपरिक वाद्यवादन, हलगीच्या सुंदर ठेक्यांनी वातावरण संगीतमय झाले होते.

Pune Metro News : करोनात पहिली नोकरी गेली पण जिद्दीने उभी राहत ती बनली ‘पुणे मेट्रोची पहिली लोकोपायलट’

व्याख्याते, डॉ. सचिन परब यांच्या सहका-यांनी व्यसनमुक्तीवर सोपे मार्ग सांगून नागरिकांना मार्गदर्शन केले. व्यसनामुळे (Nigdi ) होणारे शारिरीक,मानसिक आणि आर्थिक नुकसान याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शाहीर काशिनाथ उबाळे आणि मोहम्मद शेख यांनी नव्या जून्या लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला. दुपारच्या सत्रात सुरेश रंजवे, स्वराधीन रंगमंच मराठी कलाकार संजय फलफले यांनी प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून अण्णा भाऊंचे विचारांचे गीतमय सादरीकरण केले.

पुढील सत्रात पोतराज ते डॉक्टर असा प्रवास साध्य केलेल्या डॉ. धर्मराज साठे यांची पत्रकार शिवाजी घोडे यांनी विशेष मुलाखत घेतली. डॉ. साठे यांनी पोतराजापासून डॉक्टर पर्यतचा खडतर प्रवास कसा केला ते मुलाखतीत सांगितले. डॉक्टर झाल्यानंतर आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने त्यांनी समाजकार्य सुरू केले,अनेक मुले दत्तक घेतली त्यांना शिक्षणाच्या सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या.

सायंकाळी 4 वाजता आयोजित केलेल्या परिसंवादात  अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाचे फायदे व तोटे  यामध्ये केशव शेकापुरकार, डॉ. सुशीलकुमार चिमुरे, भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल यांचा सहभाग होता. सायंकाळी 5.30 वाजता निलेश देवकुळे यांनी प्रबोधनपर गीते तर सायंकाळी 7 वाजता ज्योती पुणेकर यांनी लोकगीतांचा भव्य कार्यक्रम सादर केला. रात्री 8 वाजता सिने कलाकार प्राजक्ता महामुनी आणि ख्यातनाम नृत्यांगना दिप्ती (Nigdi ) आहेर यांनी लोकगीतांचा भव्य कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक कार्यातील उत्कृष्ट कार्याबद्दल महादेव खुडे यांना कलारत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र,शाल श्रीफल आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.जेजुरी संस्थानच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल अनिल सौदंडे यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंतराव हरहरे, ॲड.सुशिल मंचरकर,निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ  उंडे,  एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, उद्योजक दयानंद मांजरे,महेंद्र गायकवाड,वीर बजरंगी कुणाल साठे यांना समाजमित्र हा पुरस्कार देण्यात आला. तसेच पाच दिवसीय कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल समितीच्या वतीने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विभागातील लिपिक विनोद सकट,चेतन मराठे आणि अक्षय किरवे यांचाही अध्यक्ष अण्णासाहेब कसबे आणि सचिव नितीन घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात (Nigdi ) आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.