Nigdi News : मिस्टिक बांबू तर्फे रविवारी गुरूपौर्णिमेच्या विशेष बासुरी कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – मिस्टिक बांबू तर्फे (Nigdi News) रविवारी (दि 6) गुरुपौर्णिमेनिमित्त बासुरीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम हा दुपारी 12 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहामध्ये होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून लोकांना पूर्व नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाबाबत हिमांशू नंदा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, “मिस्टीक बांबूचे ध्येय हे भारतीय शास्त्रीय संगीताचा वापर स्वतःचा विकास करणे आणि भावी संगीतकार तयार करणे ज्याच्याने शास्त्रीय संगीत पिढ्यानपिढ्या जपले जाईल असा आहे. संगीत फक्त मनोरंजन नसून अध्यात्माकडे वळवण्याचा मार्ग सुद्धा आहे. मिस्टीक बांबू हे याच प्रवासासाठी भारतीय शास्त्रीय संगीतामार्गे काम करत आहे.”

मिस्टेक बांबू ही हिंदुस्तानी बासुरी शिकवणारी एक (Nigdi News) अत्यंत प्रतिष्ठित शाळा आहे. महान बासुरी वादळ हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य हिमांशू नंदा यांनी ही शाळा स्थापित केली असून याच शाळेमधील विद्यार्थ्यांचा कार्यक्रम येत्या रविवारी होणार आहे. मिस्टिक बांबू या शाळेमध्ये जगभरातील दहा देशांमधून साधारण 6,000 विद्यार्थी आहेत.

ज्यांना स्वतःच्या संगीतेच्या कलेचा व्यवसाय करायचा आहे, त्यांना गुरुकुल पद्धतीने ही शाळा संगीत शिकवते आणि योग्य विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देखील देते. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला प्रचंड महत्त्व आहे व संगीतातही गुरु आणि शिष्याचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते.

नोंदणीसाठी अधिकृत लिंक – bit.ly/3Qiyy7T

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.