Mahalunge : किरकोळ कारणावरून तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – कंपनीत गाडी न भरल्याच्या कारणावरून (Mahalunge) झालेल्या वादातून चौघांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी साडेसात वाजता महाळुंगे ते आंबेठाण रोडवर महाळुंगे येथे घडली.

दिनेशकुमार रामखिलावन राजपूत (वय 21, रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जैनुल अबदिन उर्फ अब्दुल शौकत आल अन्सारी (वय 21), अदनान रईस अन्सारी (वय 18, मूळ रा. उत्तर प्रदेश), अनिस मोहम्मद मंजूर आलम अन्सारी (वय 21, रा. उत्तर प्रदेश. सध्या सर्व रा. महाळुंगे, ता. खेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांच्यासह इमरान (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात (Mahalunge) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi News : मिस्टिक बांबू तर्फे रविवारी गुरूपौर्णिमेच्या विशेष बासुरी कार्यक्रमाचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचे मित्र दिनेशकुमार सुरेश राजपूत, ब्रिजेशकुमार राधेशाम राजपूत, धीरजकुमार रामचंद्र राजपूत असे पायी चालत जात होते.

कंपनीत गाडी न भरल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ शाब्दिक वादातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना रस्त्यात अडवून त्यांना बेदम मारहाण केली.

फिर्यादीवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.