Alandi : अधिक मासा निमित्त माऊली मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील माऊली मंदिरात अधिक मासानिमित्त दररोज विविध (Alandi) धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. दररोज सकाळी साडेनऊ वाजता ते दुपारी साडेबारा वाजता गाथा भजन, सायंकाळी 4 ते 5 वाजता प्रवचन, सायंकाळी साडेसहा वाजता ते रात्री 8 वाजता कीर्तन, रात्री 10 ते 12 गावकरी भजन, रात्री 12 ते पहाटे 4 जागर इ. विविध धार्मिक कार्यक्रम भक्ती भावात उत्साहात पार पडत आहे.

याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
माऊली भक्त, भाविकांसाठी अधिक मासानिमित्त दररोज दुपारी भक्त निवास येथे तर रात्री माऊली मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करत आहे.

Mahalunge : किरकोळ कारणावरून तिघांना बेदम मारहाण

धार्मिक कार्यक्रमानिमित्त माऊली मंदिरामध्ये गर्दी होत आहे. माऊली (Alandi) मंदिरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई व मंडप काम करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.