Nigdi : निगडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी सुरु

एमपीसी न्यूज – निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीचे दुरुस्तीचे काम पुर्ण झाले आहे. दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर विद्युतदाहिनी सुरु करण्यात आली आहे. नवीन कॉईल, ब्रिक्स बसविल्या आहेत. त्यामुळे आता सातत्याने विद्युतदाहिनी नादुरुस्त होणार नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात आली आहे. विद्युत दाहिनीस 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्युत दाहिनीचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होत आहे. नादुरुस्त झाल्यावर महिना-महिना भर दाहिनी बंद ठेवली जात होती. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. त्यासाठी महापालिकेने तातडीने अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी सुरु करण्याची मागणी नागरिकांची होती.

अमरधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी गेल्या काही महिन्यांपासून बंद होती. विद्युत दाहिनीअभावी नागरिकांचे हाल होत होते. त्यासाठी महापालिकेने विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. विद्युत दाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. नवीन कॉईल, नवीन ब्रिक्स बसविल्या आहेत. त्यामुळे आता विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होणार नाही.

याबाबत बोलताना ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (विद्युत विभाग) प्रवीण घोडे म्हणाले, ”स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवस बंद ठेवली होती. दाहिन्याच्या दुरुस्तीचे काम पुर्ण झाले आहे. विद्युतदाहिनी सुरु केली आहे. नवीन कॉईल, नवीन ब्रिक्स बसविल्या आहेत. विटा देखील बदलल्या आहेत. त्यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही. विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होणार नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.