Nigdi : यमुनानगरमधील रस्त्यावरील खड्ड्यांच्या कचाट्यात अडकली पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी

एमपीसी न्यूज- यमुनानगर निगडी प्रभागात मागील अनेक दिवस विविध रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. सर्व रस्ते खोदण्यात आलेले आहेत, पण खोदून झाल्यावर मात्र परत नीट बुजवण्यात आलेले नाहीत किंवा तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे खोदलेल्या रस्त्यामधून वाट काढत स्थानिक नागरिकांना चालावे लागत आहे.

खोदकाम करताना अनेक ठिकाणच्या बीएसएनएलच्या केबल देखील तुटलेल्या असून नागरिकांची फोन सेवा तसेच इंटरनेट सेवा बंद पडलेली आहे. याबाबत तक्रार केली असता बीएसएनएल चे कर्मचारी देखील खोदलेल्या रस्त्यांचे कारण देऊन तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. कधी पाण्याची लाइन फुटते तर कधी ड्रेनेज तुंबून सर्वत्र घाण पसरते. रोज वेगवेगळ्या अडचणीना यमुनानगरमधील रहिवासी तोंड देत आहेत. पण त्यांच्या गैरसोयींकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

भाजपाच्या आदित्य कुलकर्णी ह्यांनी थेट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा हे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. त्यामुळे या प्रश्नांकडे तातडीने लक्ष घावे अशी मागणी केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.