Nigdi : आता दर रविवारी निगडी ते सिंहगड पायथा थेट बससेवा सुरु

एमपीसी न्यूज – फाल्कन ट्रेकर्स चिंचवड  यांच्या  प्रयत्नातून ( Nigdi ) निगडी ते सिंहगड पायथा  थेट बससेवा सुरु  झाली आहे. रविवार दि. 18 रोजी  विश्वजीतदादा बारणे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सर्वांच्या उपस्थितीत  उत्साहात आणि थाटामाटात  ही बस   सिंहगड पायथ्याला रवाना झाली.छत्रपती शिवाजी महाराजांवर, तानाजी मालुसरेंच्या पराक्रमावर, सिंहगडावर प्रेम करणाऱ्यांच्या सोयीसाठी ही बससेवा सुरु  करण्यात आली आहे.

Kasarwadi: माजी नगरसेवक चंद्रकांत लांडगे यांचे निधन

ही बस दर रविवारी पहाटे 5 वाजता भक्ती शक्ती बस स्थानक निगडी येथून निघेल आणि चिंचवड, भूमकर चौक मार्गे सिंहगड पायथ्याला साधारण 6.45 ला पोचेल तर परतीसाठी तिकडून 10  वाजता निघून निगडीला 11.45  पर्यंत येईल.

फाल्कन ट्रेकर्स चिंचवडचे  दिलीप दादा व  साहेबराव पुजारी यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेली ही महत्त्वपूर्ण सेवा अथकपणे सुरू ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी या  सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात ( Nigdi ) आली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.