Nigdi : रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  पायी जाणाऱ्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा रिक्षाच्या धडकेत मृत्यू ( Nigdi) झाला आहे. ही घटना रविवारी (दि.25) निगडीतील दुर्गामाता मंदिराजवळ रात्री घडली.

याप्रकरणी नितीन बन्सी भुबाळ (वय 35 रा.निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बन्सी किसन भुबाळ (वय 65) असे मृत्यू पावलेल्या नागरिकाचे नाव आहे.

Maval : पवन मावळातील बंगल्यात आढळले भारतीय अजगर: दहा दिवसातील चौथी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील बन्सी भुबाळ हे दुर्गामाता मंदिराजवळून पायी जात होते. यावेळी आरोपी हा त्याच्या ताब्यातील रिक्षा  वेगात घेऊन आला, व त्याने बेदरकारपणे भुबाळ यांना जोरात धडक दिली. यावेळी तेथे न थांबता तेथून पळून गेला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भुबाळ यांचा मृत्यू झाला. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील ( Nigdi) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.