Maval : पवन मावळातील बंगल्यात आढळले भारतीय अजगर: दहा दिवसातील चौथी घटना

एमपीसी न्यूज – पवन मावळातील औंढोली गावात एका बंगल्यामध्ये तीन फुटांचा भारतीय अजगर ( Maval ) आढळला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी अजगराला पकडून त्याची तपासणी करत नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडून दिले. मागील दहा दिवसांपूर्वी देखील या ठिकाणी आठ फुटांचा मोठा अजगर सापडला होता. मावळ भागात मानवी वस्तीत मागील दहा दिवसात चार ठिकाणी साप आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर औंढोली गावात एकाच ठिकाणी मागील दहा दिवसात दोन अजगर आढळले.

Talegaon Dabhade : सामाजिक सलोखा राखत तळेगावात ईद उल व आषाढी एकादशी साजरी

 

औंढोली गावात एका बंगल्यात साप असल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य मोरेश्वर मांडेकर यांना मिळाली. मोरेश्वर मांडेकर यांनी तात्काळ औंढोली गावाकडे धाव घेतली. बंगल्यामध्ये माळी काम करणाऱ्या कामगाराने मांडेकर यांना बंगल्यामध्ये असलेला साप दाखवला. त्याची पाहणी करून ओळख पटवत मांडेकर यांनी नागरिकांचे समुपदेशन केले. हा विषारी साप नसून भारतीय अजगर आहे. यापासून कोणताही धोका नसल्याचे त्यांनी नागरिकांना सांगितले.

 

मांडेकर यांनी अजगराला पकडून वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे व वन विभागाचे अधिकारी हनुमंत जाधव यांना माहिती दिली. अजगराची प्रकृती चांगली असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

 

मागील दहा दिवसांपूर्वी औंढोली येथे सुतार गुरूजी यांच्या बकरीपालन शेडजवळ आठ फूटी लांबीचा अजगर आढळला होता. त्याच परिसरात पुन्हा अजगराचे पिल्लू आढळून आले आहे. दहा दिवसांपूर्वी आढले खुर्द गावात एका घरात अत्यंत विषारी असलेल्या घोणस जातीच्या सापाची 20 पिल्ले आढळली होती. 28 जून रोजी कामशेत येथे आठ फुटांचा अजगर आढळला होता.

 

आपल्या परिसरात वन्यप्राणी आढळून आल्यास त्याची माहीती वन विभाग टोल फ्री क्रमांक 1926 किवां वन्यजीव रक्षक मावळ संस्था अथवा जवळच्या प्राणी मित्रांना द्यावी असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून करण्यात आले ( Maval ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.