Talegaon Dabhade : सामाजिक सलोखा राखत तळेगावात ईद उल व आषाढी एकादशी साजरी

एमपीसी न्यूज – आषाढी एकादशी आणि  ईद उल अजहा अर्थात बकरी ईद एकाच दिवशी असताना (Talegaon Dabhade)  तळेगाव दाभाडे परिसरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत ईद उल एकादशी आनंदाने साजरी केली. कुर्बानी विरहित शाकाहारी बकरी ईद साजरी करत सामाजिक सलोखा राखण्यात आला. यामुळे हिंदू मुस्लिम कुटुंबातील जिव्हाळ्याच्या नात्याला सणांची दुपदरी किनार लाभल्याचे चित्र गल्ली मोहल्ल्यात होते.

गाव भागातील जामा मशिदीत सकाळी 9 वाजता सुमारे दीड हजारावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. मौलाना सिकंदर ए आजम यांनी खुतबा(प्रवचन) दिले.

स्टेशन भागातील नूर मशिदीत सकाळी साडेसात व सव्वा आठ वाजता दोन सत्रात नमाज अदा करण्यात आली. मौलाना शाहिद सिकिलकर आणि हाफिज अब्दुल कय्युम यांनी प्रवचन आणि नमाजपठण केले. अल्लाहने सांगितलेल्या आणि प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी पोचवल्या मानवतेच्या संदेशानुसार, कोणतेही कर्तव्य बजावताना त्यात इखलास (निःस्वार्थ भावना) आपण ठेवली पाहिजे, असे हाफिज अब्दुल कय्युम यांनी यावेळी आवाहन केले.

पांच पिर मस्जिद मध्ये मौलाना असजद पठाण यांनी जमातीसह नमाज पढविली.

Lonavala : जिल्हा परिषद शाळेत 7 वर्षीय मुलीवर 12 वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार, लोणावळा ग्रामीण भागातील प्रकार

दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह उपवासाचा फराळ ईद मिलन कार्यक्रमात असल्याने तो कौतुकास्पद उपक्रम असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

जामा मशिदीचे विश्वस्त रशीद सिकिलकर, नूर मस्जिदचे विश्वस्त अय्युब सिकिलकर, पांच पिर मस्जिदचे विश्वस्त जमीर नालबंद, एनसीपी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष बाबा मुलाणी, मराठी मुस्लिम मंचचे अध्यक्ष अमिन खान, डॉ.तौसिफ शेख, समीर नालबंद आदि मान्यवरांनी ईद उल एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, उद्योजक रामदास काकडे, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष शैलजा काळोखे आदि प्रतिष्ठितांनीही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते बाबूलाल नालबंद व गफूरभाई मुलाणी,माजी नगरसेवक गनिमिया सिकिलकर, अल्पसंख्याक सेलच्या तालुका अध्यक्ष शबनम खान यांनीही हिंदू बंधुभागिनींना शुभेच्छा (Talegaon Dabhade)  दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.