Khed : दारु पिऊन मारणाऱ्या नवऱ्या विरोधात पत्नीची पोलीसात तक्रार

एमपीसी न्यूज –  सतत दारु पिऊन पत्नीला त्रास देणाऱ्या नवऱ्या (Khed) विरोधात पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली असून चाकण पोलीस ठाण्यात याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2016 पासून ते जून 2023 या कालावधीत खेड येथील चिंचोशी येथे घडला आहे.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.29) फिर्याद दिली असून पती सोमनाथ एकनाथ दरगुडे (रा. चिंचोशी, खेड) व एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi : रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी पती हा सतत दारु पिऊन मारहाण व शिवीगाळ करत होता तर महिला आरोपी देखील शारीरिक व मानसिक त्रास देत होती. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Khed) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.