Nigdi : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीला घातला 24 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – अकाउंट विभागात काम करणाऱ्या (Nigdi )दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या खात्यावरून 24 लाख रुपये परस्पर घेऊन कंपनीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडला.

गणेश उर्फ मयूर धावडे (वय 34, रा. चाकण) आणि (Nigdi )एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या कंपनीत काम करत होते. गणेश याच्याकडे कंपनीच्या संपूर्ण अकाउंट विभागाची जबाबदारी होती. तर आरोपी महिलेकडे भेळ चौकात असलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म अकादमी आणि एव्हिएशन अकादमीमधील रोज नवीन प्रकल्पासाठी होणारा जमा खर्च बघण्याची जबाबदारी होती.

दोघांनी कंपनीचे व्यवस्थापन आणि मालकाचा विश्वास संपादन करून रोख आणि चेकद्वारे कंपनीच्या खात्यातून 24 लाख 30 हजार 828 रुपये काढून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.