Pimpri News : स्वरसागर महोत्सवात आज निनाद अधिकारी यांचे संतूरवादन, आनंद भाटे यांचे गायन

एमपीसी न्यूज : यंदाच्या 22 व्या स्वरसागर महोत्सवात रविवारी 7 फेब्रुवारीला पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रम सुरु होणार आहेत. 

यात पहिल्या सत्रात उगवते तारे या अंतर्गत सायंकाळी सहा वाजता पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य निनाद अधिकारी हे संतूरवादन सादर करतील. त्यांना यंदाच्या पं. पद्माकर कुलकर्णी पुरस्काराचा मानकरी युवा तबला वादक शंतनू देशमुख तबला साथ करेल.

त्यानंतर सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन होईल. पुढील सत्रात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंदगंधर्व म्हणजेच आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन होईल. आणि महोत्सवाचा समारोप पद्मश्री उस्ताद शाहिद परवेझखान यांच्या सतार वादनाने होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.