Nigdi Crime News : मला कोणीही काहीही करू शकत नाही, मला क्राईमचे मोठे साहेब ओळखतात म्हणत दारुड्याचा भररस्त्यात राडा

एमपीसी न्यूज – ‘मला कोणीही काहीही करू शकत नाही. माझे मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर फोटो आहेत. मला क्राईमचे मोठे साहेब ओळखतात’. असे म्हणत एका दारुड्याने भररस्त्यात राडा घातला. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी दीड वाजताच्या सुमारास निगडी परिसरातील पीसीएमसी कॉलनी मध्ये सार्वजनिक रोडवर घडली.

अतुल शिवाजी माकर (वय 34, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी) असे राडा घालणाऱ्या दारुड्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार प्रशांत माळी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल याने दारू पिऊन पीसीएमसी कॉलनी निगडी येथे सार्वजनिक रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरडा केला. ‘पोलीस खात्यात माझ्या खूप वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळखी आहेत. मला कोणीही काहीही करू शकत नाही. माझे मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर फोटो आहेत. मला क्राईमचे मोठे साहेब ओळखतात’. असे म्हणत आरोपीने अर्वाच्च शिवीगाळ करून सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी शांततेचा भंग केला. याबाबत त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 85 (1), 112, 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.