Amruta Fadanvis : होय ! मी भक्त आहे, आणि मला त्याचा अभिमान आहे – अमृता फडणवीस

एमपीसी न्यूज – ‘होय, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे,’ असं अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्वीटसोबत देशात आतापर्यंत झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीचा आलेख ट्वीट केला आहे.

भारतात जगातील सर्वाधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. भारताने लसीकरणाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 32 कोटी 90 लाख 29 हजार 510 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. लसीकरण बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकले असून हेच अमृता फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.

अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेपेक्षा भारताची लोकसंख्या कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे लसीकरणाचा हा उच्चांक नाही असे अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या अनेक वक्तव्यांसाठी चर्चेत राहिल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखती असो की एखाद्या विषयावर मत मांडणं असो, अमृता फडणवीस या सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.