Pune : आता प्रत्येक महाविद्यालयात ‘ग्रीन क्लब’ची स्थापना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुचना

एमपीसी न्यूज – पुणे (Pune) आणि नगर जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात ग्रीन क्लब ची स्थापना करण्यात यावी, अशी सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिली आहे. त्यामुळे ‘ग्रीन क्लब’च्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचतीचा संदेश देणारे पर्यावरण दूत बनणार आहेत.

Bhosari : स्टोअर मॅनेजरने केली एअरटेल कंपनीची फसवणूक

राज्य सरकार आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांच्या सहभागाने नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि पाण्याची बचत हे अभियान राबविले जाणार आहे. हे अभियान पुणे आणि नगर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात उच्च शिक्षण संचालकांनी दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालयांमध्ये ‘ग्रीन क्लब’ची स्थापन करण्यात यावी, अशी सूचना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना परिपत्रकाद्वारे दिली आहे.

युनिसेफच्या युथ एगेंज्ड ऑफ वॉटर स्टेवॉर्डशिप या उपक्रमांतर्गत प्रत्येक महाविद्यालयात ग्रीन क्लबची स्थापना होणे अनिवार्य आहे. हा ग्रीन क्लब उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाची ग्रीन क्लब समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमाच्या पर्यवेक्षकांची जबाबदारी संबंधित महाविद्यालयातील प्राचार्यांकडे असणार आहे, असे डॉ. भोसले यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

  https://youtu.be/R14GR7YCQYo?si=peLSPc2jB3iouwSy

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.