Pune : मिरवणुकीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या ओंकार कुडलेला मावळातून ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त छापलेल्या बॅनरवर फोटो लावला नाही आणि नाव टाकले नाही म्हणून एका गुन्हेगाराने भर मिरवणुकीत गोंधळ घातला होता. हातात तलवार घेऊन त्याने दहशत माजवली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र पुणे (Pune) पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आणि फरार झालेल्या मुख्य आरोपीला मावळातील पवना डॅम जवळील जंगलातून वेड्या ठोकल्या.

Pune : महाविद्यालयांनी 100 टक्के विद्यार्थी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

ओमकार उर्फ आबा शंकर कुडले (रा. सागर कॉलनी कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अशोक बाळकृष्ण कळसकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. पवना जवळील दुर्गम भागात हे दोघेही लपून बसले होते.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती होती. कोथरूड येथील शास्त्रीनगरमध्ये मिरवणूक जोरात सुरू होती. यावेळी आरोपी ओमकार कुडले यांनी बॅनरवर आपले नाव का छापले नाही म्हणून हातात तलवार घेऊन दहशत माजवली होती. त्याच्या हातातील तलवार पाहून एकच गोंधळ माजला होता. पळापळ झाली होती. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाला होता. दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. आज तो पवना डॅम जवळील डोंगराळ भागात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर स्वतः पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर आणि त्यांचे इतर सहकारी पवना डॅम परिसरात दाखल झाले. त्यानंतर दुर्मिळ भागात शोध घेऊन ओमकार कुडलेसह त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.