Chikhali : चिखली पोलिसांनी गुजरातमध्ये पकडला रावण गॅंगचा गुंड

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला रावण टोळीतील गुंड व मोकातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. चिखली (Chikhali) पोलिसांनी गुजरातमधील वडोदरा येथे ही कारवाई केली.
कपिल उर्फ विजय दिपक लोखंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रावण टोळीचा सदस्य आहे. चिखली येथे 22 मे रोजी सोन्या तापकीर या तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. याप्रकरणातील प्रमुख आरोपीसह इतरांना पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून अटक केली.
पोलिसांनी या टोळीला मोकाही लावला. मात्र लोखंडे हा मे महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता. तेव्हापासून चिखली पोलीस त्याच्या मागावर होते.

28 जुलै रोजी कपिल लोखंडे याने इंस्टाग्राम वरुन चिखली परीसरात राहणाऱ्या मैत्रीणीला संपर्क केल्याचे पोलिसांच्या तांत्रीक विश्‍लेषणात दिसून आले. चिखली पोलिसांनी तात्काळ त्याच्या मैत्रिणीस ताब्यात घेवून तिच्या माध्यमातून लोखंडे याच्याशी संपर्क सुरू ठेवला.
पोलीस उपनिरीक्षक बारावकर यांच्या पथकाने वडोदरा, गुजरात येथे जाऊन तेथील स्थानिक मकरपुरा पोलिसांची मदत घेवुन लोखंडे याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्‍त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, भानुदास बर्गे, सहायक निरीक्षक तोफिक सय्यद, उपनिरीक्षक पुजारी, कुमटकर, बारवकर, कर्मचारी वडेकर, नागरे, तारळकर, साकोरे, जाधव, पिंजारी, केदार नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.