Chikhali : गोडाऊन फोडून मोबाईल टॉवरचे पार्ट चोरणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – चिखली येथे एका गोडाऊनमधून (Chikhali) मोबाईल कंपनीच्या टॉवर पार्टची चोरी झाली. या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकने पकडले. त्याच्याकडून दहा लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जमीरुल्लाह हकिकुल्लाह सहा (वय 46, रा. वडाचा मळा, जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस चिखली परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, एक संशयित व्यक्ती चोरीचा माल भरून जाधववाडी येथील राम मैदानामध्ये टेम्पोसह थांबला आहे.

त्यानुसार पोलिसांनी मैदानात सापळा लावून संशयित व्यक्ती जमीरुल्लाह याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक टेम्पो, टॅम्पोमध्ये मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येणारे तीन नविन रेडिमेड टिसीयू बॉक्स असा एकूण 10 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Bhosari : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जप्त केलेल्या मालाबाबत पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी (Chikhali) केली असता, मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येणारे तीन नविन रेडिमेड टिसीयु बॉक्स त्याने त्याच्या तीन साथीदारांसह जाधववाडी, चिखली येथील धनश्री इंजिनियरींग गोडाऊन मधून गोडाऊनचे कुलूप तोडून चोरी केल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप निरीक्षक शेख, पोलीस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ जावळे, महादेव जावळे, अजित रूपनवर, शिवाजी कानडे, मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडिक, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकार, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, स्वप्नील महाले यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.