Alandi : एमआयटी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील माईर्स एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (Alandi) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाचे आयोजन 24 जुलै ते 28 जुलै या कालावधीत करण्यात आले होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहाचे उद्घाटन डॉ. पराग काळकर, डीन फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी केले. 

त्यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागरूकता’ या विषयावर उपस्थितांना प्रबोधन केले. डॉ. पराग काळकर यांची मुलाखत प्रा. पल्लवी बोंगाणे यांनी टीवायबीबीएची (सीए) विद्यार्थिनी मिताली कांबळे यांनी घेतली. विद्यार्थ्यांसाठी रील स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर सादरीकरण स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

रील स्पर्धेचे 25 जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. यात 21 विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने सहभाग घेतला होता.  निबंध स्पर्धेचे 26 जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यात 124 निबंध विद्यार्थ्यांकडून प्राप्त झाले. पोस्टर सादरीकरण स्पर्धा 27 जुलै आयोजित करण्यात आली होती.

Chikhali : गोडाऊन फोडून मोबाईल टॉवरचे पार्ट चोरणाऱ्यास अटक

या स्पर्धेत एकूण 47 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 28 जुलै रोजी वक्तृत्व स्पर्धेचे (Alandi) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 31 जुलै रोजी समापन समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. बी. बी. वाफरे , उपप्राचार्य डॉ. मानसी अतितकर आणि प्रा. अक्षदा कुलकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

या सप्ताहचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महावविद्यालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विभागाच्या समन्वयक डॉ. अर्चन आहेर सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घतले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.