Chikhali : सोनसाखळी चोराला अवघ्या 2 तासात केले जेरबंद, चिखली पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 ची संयुक्त कारवाई

एमपीसी न्यूज – वयस्कर महिलेची सोन्याची पोत चोरून (Chikhali) पळून जाणाऱ्या चोराला चिखली पोलीस व गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अवघ्या 2 तासात जेरबंद केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.5) दुपारी दीड वाजता जाधववाडी, चिखली येथे घडली. विनोद सिताराम जाधव (वय 34 वर्ष, रा. जाधववाडी चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी चिखली येथे ज्येष्ठ महिला फुटपाथवरुन पायी  घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून पाठीमागून येऊन आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळून गेला.

या बाबत चिखली पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनकडील उपनिरीक्षक पुजारी तसेच पोलीस अंमलदार गणेश साबळे, गणेश शिंदे, आनंदा नागरे, राकेश बनसोडे नारायण तांबे तसेच गुन्हे शाखा युनिट 1 कडील सोमनाथ बो- हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अजित रुपनवर, नामदेव वडेकर असे दोन पोलीस पथक तयार करुन चैन स्नेचिंग गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली.

परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज चेक करुन आरोपीचे फुटेज मिळताच परिसरातील लोकांकडे प्रसारित करुन त्या आधारे आरोपीचा माग काढला . आरोपी निष्पन्न होताच त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करताच त्याने (Chikhali) गुन्हा कबूल केला. आरोपीकडून पोलिसांनी 1 लाख 8 हजार रुपयांची सोन्याची पोत जप्त केली.

Chinchwad : शेतकऱ्यांनी शेतीला जोडून जोड उद्योग करावेत – प्राचार्य डॉ. ए.के. वाळूंज

ही कारवाई चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे, पोलीस उपनिरीक्षक पुजारी तसेच पोलीस अंमलदार गणेश साबळे, गणेश शिंदे, आनंदा नागरे, राकेश बनसोडे, नारायण तांचे तसेच गुन्हे शाखा युनिट 1 कडील सोमनाथ बो-हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अजित रुपनवर, नामदेव वडेकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.