Alandi : भागीरथी कुंडाजवळ कचरा टाकू नये; विद्युत विभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज : आळंदी येथील भागीरथी कुंडाजवळ (Alandi) बेशिस्तपणे काही नागरिक कचरा टाकतात. तोच कचरा अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आला. यामुळे तेथील विद्युत वहिनीचा काही भाग जळाला होती. सुदैवाने मेन विद्युत वहिनीला आग न लागल्याने मोठा अनर्थ टळला.

कोणतीही जीवितहानी झाली नाही. तेथील विद्युतवाहिनीचे तत्काळ दुरुस्तीचे कार्य करण्यात आले आहे. याबाबत माहिती विद्युत कर्मचारी अजित घुंडरे यांनी दिली.

Chikhali : सोनसाखळी चोराला अवघ्या 2 तासात केले जेरबंद, चिखली पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 ची संयुक्त कारवाई

भागीरथी कुंडा जवळ  कचरा टाकू नये. असे आवाहन यावेळी विद्युत विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच या पवित्र कुंडा जवळ कचरा टाकू नये यासाठी काही स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.