Hinjawadi : पीएमआरडीएच्या माण येथील दोन शैक्षणिक सुविधा भूखंडांचे होणार ई लिलाव

एमपीसी न्यूज : माण-हिंजवडी परिसरात पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या (Hinjawadi) विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माण येथील दोन शैक्षणिक सुविधा भूखंड 80 वर्षाच्या दीर्घ मुदतीने भाडेपट्ट्याने ई लिलावा द्वारे देण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे जमीन व मालमत्ता विभाग उप आयुक्त रामदास जगताप यांनी दिली आहे.

ई लिलाव होणारे माण तालुका मुळशी येथील सं. नं. 98/99/101 मधील 135 आर आणि सं.नं. 288 मधील 62 आर क्षेत्र हे दोन्ही भूखंड शैक्षणिक प्रयोजनासाठी आरक्षित केलेले सुविधा भूखंड आहेत. त्यांच्या ई लिलावासाठी इच्छुक असणाऱ्या शैक्षणिक संस्था अथवा धर्मादाय संस्थांना दि. 24 जानेवारी पर्यंत ई लिलाव पोर्टलवर (https://eauction.gov.in ) नोंदणी करता येईल व प्रत्यक्ष ई लिलाव दि. 31 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पासून सुरु होईल.

पुणे महानगर प्रदेशातील पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी प्राधिकरणाच्या मालकीचे हे दोन्ही सुविधा भूखंड 80 वर्षाच्या दीर्घ मुदत भाडे पट्ट्याने वितरीत करण्यासाठी 31 जानेवारी रोजी ई लिलाव केले जाणार आहेत.

Chikhali : सोनसाखळी चोराला अवघ्या 2 तासात केले जेरबंद, चिखली पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 ची संयुक्त कारवाई

त्यातून प्राधिकरणाला सुमारे 20 ते 25 कोटीचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. या ठिकाणी वापर (Hinjawadi) संबंधीत संस्थेला फक्त शैक्षणिक कारणासाठी च करता येणार आहे. क्षेत्राने मोठे सदरचे दोन्ही भूखंड मान हिंजवडी च्या विकसित क्षेत्रात असल्याने या ठिकाणी उच्च दर्जाचे शैक्षणिक संकुल विकसित होण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरेल , असेही प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.