Pune : रास्त भाव दुकान परवान्यांसाठी 1 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

एमपीसी न्यूज – अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे (Pune) व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात 25 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी सिमा होळकर यांनी दिली.

Pune : मिरवणुकीत तलवारीने दहशत माजवणाऱ्या ओंकार कुडलेला मावळातून ठोकल्या बेड्या

परिमंडळ अधिकारी ब, क, फ, ग, ह, ल, म यांच्या कार्यक्षेत्रातील 25 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा 1 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील काही भागातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता नवीन शिधावाटप, रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

त्यानुसार इच्छुक व पात्र संस्थांनी 1 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही होळकर यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.