Talegaon : आर्थिक छळाला कंटाळून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – आर्थिक छळाला कंटाळून एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 16) दुपारी दोन वाजताच्या सुमारास सोमाटणे फाटा मावळ येथे घडली.

Bhosari : घरासमोर जाऊन तरुणीशी गैरवर्तन

शेखर अशोक खंबायत (वय 37, रा. सोमाटणे फाटा, मावळ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने याप्रकरणी तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुलदीप लोहोर (वय 39, रा. धामणे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपूर्वी आरोपीने फिर्यादी यांचे पती शेखर यांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी 15 लाख रुपये दिले होते. त्या गुंतवलेल्या पैशांच्या बदल्यात 10 टक्के परतावा देण्यासाठी आरोपीने शेखर यांच्याकडे तगादा लावला.

त्यासाठी त्यांना वारंवार शिवीगाळ, धमकी देऊन त्रास दिला. त्यामुळे शेखर यांनी छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव (Talegaon) दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.