Pimpri : दस्त नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया झाली ढिम्म

एमपीसी न्यूज – दस्त नोंदणीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे. फेसलेस असलेल्या या प्रक्रियेत हल्ली अनेकांना सरकारी कार्यालयात जाऊन चेहरे दाखविल्याशिवाय कामच होत नसल्याचा अनेकांना अनुभव येत आहे. (Pimpri) त्यामुळे ही ऑनलाईन प्रक्रिया अतिशय ढिम्म झाली असून तब्बल महिना भराच्या कालावधीनंतर देखील दस्त नोंदणी होत नाही.

पुणे शहरातील एका पक्षकाराने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन लिव्ह अँड लायसन्स अॅग्रीमेंट 3 मार्च रोजी ऑनलाईन माध्यमातून नोंदवले. ऑनलाईन माध्यमातून दाखल केलेले अॅग्रीमेंट नियमानुसार 48 तासात रजिस्टर होणे गरजेचे आहे. मात्र ते रजिस्टर झाले नाही. एक आठवडा उलटून गेला तरी देखील त्याची नोंद झाली नाही. त्यामुळे पक्षकाराने नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सारथी हेल्पलाईनवर मदत मागितली. तिथेही सुरुवातीला अॅग्रीमेंट लवकरच नोंद होईल, असे सांगण्यात आले.

मात्र आणखी आठवडा उलटला तरीही अॅग्रीमेंट नोंद झाले नाही. त्यामुळे पक्षकाराने याबाबत हेल्पलाईनकडे तक्रार दाखल केली. तक्रार करूनही 15 दिवस उलटले तरीही देखील संबंधित पक्षकाराचे अॅग्रीमेंट नोंद झाले नाही. पक्षकाराने वकिलाच्या माध्यमातून चौकशी केली असता त्यांचा दस्त हवेली क्रमांक 26 कडे नोंदणीसाठी आलेला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या हवेली क्रमांक 26 या कार्यालयात जाऊन चौकशी करण्यात आली. तिथे अनेक आर्जव केल्यानंतर पक्षकाराच्या अॅग्रीमेंटची नोंद झाली.

PCMC : मालमत्ता कराच्या सवलती जाहीर; 10 ते 20 टक्यांपर्यंत सवलत

पुणे परिसरात दस्त नोंदणीची 22 कार्यालये आहेत. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्ष नोंदणीसाठी तो दस्त 22 पैकी एका कार्यालयात जातो. सर्वसामान्य नागरिकांना याबाबत माहिती नसते.(Pimpri) नागरिकांना नाहक त्रास होऊ नये. चिरीमिरीची सवय लागू नये यासाठी फेसलेस सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र तांत्रिक अडचणी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ढिम्मपणा यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन नोंदणीसाठी आर्जव करावे लागत आहे. यामुळे निबंधकांच्या कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे.

याबाबत बोलताना अॅड. अर्जुन दलाल म्हणाले, “दस्त नोंदणीची फेसलेस प्रक्रिया आहे. पण ती प्रत्यक्षात उतरलेली दिसत नाही. नोंदणी केल्यानंतर 48 तासात दस्त नोंदणी होऊन ती कागदपत्रे डाउनलोड करता येतात. ऑनलाईन प्रक्रिया करूनही जर प्रत्यक्ष कार्यालयात जाऊनच नोंदणी करावी लागणार असेल (Pimpri) तर ऑनलाईनच्या विळख्यात न अडकता थेट कार्यालयात जाऊन नोंदणी केलेली बरी, अशी भावना अनेक पक्षकारांची होऊ लागली आहे. दस्त नोंदणी प्रक्रियेतील अनेक अडचणींमुळे शासनाचा उद्देश सफल होत नाही. शासन स्तरावरून यामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.