Pimpri : अशी लावा घरातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट

एमपीसी न्यूज- प्लास्टिकचा सर्रास होणारा वापर पर्यावरणाला मारक ठरतो.(Pimpri) त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा निर्णय प्रत्येकाने घ्यायला हवा.

प्रत्येकाने एका लहान कामाला सुरुवात  करा. ती कशी अगदी सोपी पद्धत आहे. प्रत्येक घरांमध्ये दररोज कमीत कमी एक किंवा जास्त प्लास्टिक पिशव्या येतात. त्यामध्ये तेल पिशवी, दूध पिशवी, किराणा पिशवी, शैपू साबण, मॅगी, कुरकुरे, इत्यादी पिशव्या येतात. त्यामध्ये तुम्हाला एका पाण्याच्या बाटली चा उपयोग करायचा आहे.

Pimpri : दस्त नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया झाली ढिम्म

यामध्ये तुमच्या घरात येणाऱ्या पिशव्या आपल्या कचऱ्यात न टाकता दररोज पाण्याच्या बाटलीमध्ये टाकायचा आहेत. आठवड्यातून एकदा ही बाटली भरली कि तिचे व्यवस्थित झाकण लावून कचऱ्यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावर खाणार नाहीत. प्लास्टिक कचऱ्याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागेल. तसेच कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर होईल.

एवढ्या लहान कामातून पर्यावरण, आणि येणाऱ्या पिढीला खूप मोठा फायदा होईल. हे काम प्रत्येकाला जमेल त्या वेळेत जमेल त्या पद्धतीने करता येईल. तेवढे शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करावा.(Pimpri) तसेच शहरापासून ते गावातील प्रत्येक घरात ही चळवळ उभी करण्याची काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून प्रत्येकाच्या घरात या शुभ कार्याला सुरुवात करावी. त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहील. व प्राण्यांचा जीवालाही धोका होणार नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.