‘स्वरोन्मेष’ कार्यक्रमाचे आयोजन; नाशिकच्या दसककर भगिनींचा सुरेल स्वराविष्कार ऐकण्याची पुणेकर रसिकांना पर्वणी

एमपीसी न्यूज : नाशिकमधील संगीतक्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एक असलेल्या दसककर घराण्यातील अश्विनीईश्वरीगौरी आणि सुरश्री यांचा सुरेल आविष्कार अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टपुणे आयोजित ‘स्वरोन्मेष‘ या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीयउपशास्त्रीयफ्युजनसुगम गायन-वादनाचा व्होकल हार्मनितून (स्वर-सुसंवाद) अनोखा स्वराविष्कार सादर होणार आहे.

दसककर भगिनींना सुजित काळे तबला साथ करणार आहेत. तर कार्यक्रमाचे निवेदन ऋचा दीक्षित-मुळे यांचे असणार आहे.

Pimpri news: भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ चिंचवडमध्ये पदयात्रा 

दसककर भगिनींना संगीतकलेचा वारसा घरातूनच मिळाला आहे. आजोबा ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संवादिनीवादक पं. प्रभाकर दसककरकाका संगीततज्ज्ञ माधव दसककर तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनीवादक पं. सुभाष दसककर यांच्याकडे झाले आहे. जयपूरग्वाल्हेरकिराणा घराण्याच्या समग्र गायिका विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर व विदुषी मंजिरी असनारे-केळकर यांच्याकडे त्यांचे सांगीतिक शिक्षण झाले आहे. दसककर भगिनींना त्यांच्या लहानपणीच स्वरज्ञान सहजसाध्य झाल्याने शास्त्रीय संगीतउपशास्त्रीय संगीतअभंगभजनगौळणभावगीतेगझलफ्युजन याबरोबच हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादनात त्या पारंगत आहेत.

स्वरोन्मेष‘ हा कार्यक्रम शनिवारदि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता कोथरूडमधील बालशिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम शाळेच्या (एमईएस) सभागृहात होणार आहेअशी माहिती उत्तुंग परिवाराचे विश्वस्त ओंकार खाडिलकर यांनी दिली. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून प्रथम येणे प्रथम बसणे तत्त्वावर विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमस्थळी उपलब्ध असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.