Pimpri Chinchwad News: जिल्हास्तरीय ऐरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक संघटना व हेवन जिम्नॅस्टिक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने एरोबिक्स जिम्नॅस्टिक जिल्हा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हेवन जिम्नॅस्टिक अकादमी, काकाज इंटरनॅशनल स्कूल, तापकीर नगर, डिपी रोड, रहाटणी येथे ह्या स्पर्धा होणार आहेत.

या स्पर्धांचे पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच जिल्हास्तरावर आयोजन करण्यात येते आहे. साधारण वैयक्तिक, तिहेरी व सामुहिक या प्रकारांचे सादरीकरण होणार असुन 11,14,17 व खुल्या गटातील वयोगटात स्पर्धा बघायला मिळणार आहे.

‘स्वरोन्मेष’ कार्यक्रमाचे आयोजन; नाशिकच्या दसककर भगिनींचा सुरेल स्वराविष्कार ऐकण्याची पुणेकर रसिकांना पर्वणी

या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून म्हणून पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे, संजोग ढोले, विजय शिनकर, विनोद तापकीर, नविन तापकीर, सचिन काळभोर उपस्थितीत रहणार असुन संघटनेतर्फे संजय शेलार, अकादमीतर्फे अलका तापकीर, चैतन्य कुलकर्णी सर्व स्पर्धेचे नियोजन करणार आहेत. ही माहिती हेवन जिम्नॅस्टिक अकादमीचे प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांनी दिली.

हेवन जिम्नॅस्टिक अकादमी ही खेळाडूंची पुढची पिढी सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अकादमी सातत्याने एरोबिक्स जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू चमकवत असते. पिंपरी चिंचवडला पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी अकादमीचे योगदान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.