Pimpri News : राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धेत पिंपरी-चिंचवडला पहिले सुवर्णपदक 

एमपीसी न्यूज – श्रीष्टी खोडके हिने राष्ट्रीय स्तरावरील जिम्नास्टीक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. श्रीष्टीने पिंपरी-चिंचवडला राष्ट्रीय स्तरावरील जिम्नास्टीक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. 

कर्नाटक जिमनॅस्टिक संघटनेतर्फे आयोजित 16 वी राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नास्टीक स्पर्धा 26 व 28 मार्च रोजी बेंगलोर येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे पिंपरी-चिंचवडमधून हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेत 11 वर्षाखालील वैयक्तिक मुली प्रकारात श्रीष्टी खोडके हिने सुवर्णपदक पटकावले. तर 14 वर्षाखालील तिहेरी प्रकारात रौप्य पदक पटकावले, यात परीजा क्षीरसागर, अनुष्का लुणावत व अनवी पाटील यांनी आपले सादरीकरण केले.

स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र जिम्नास्टीक संघटने तर्फे हर्षद कुलकर्णी यांची निवड झाली होती. हेवन संस्थेचे संस्थापक चैतन्य कुलकर्णी, संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक व पिंपरी चिंचवड जिम्नास्टीक संघटनेच्या उपाध्यक्षा अलका तापकीर, अध्यक्ष संजय मंगोडेकर, सचिव संजय शेलार व पालकांनी स्पर्धकांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.