Vadgaon Maval : समाजकारणातून विकास साधणे हेच आमच्या राजकारणाचे सूत्र; गणेश अप्पा ढोरे, पंढरीनाथ ढोरे यांची माहिती

एमपीसी न्यूज – लोकांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत लोकांसाठी अहोरात्र कष्ट करणे, विविध प्रश्न मार्गी लावणे आणि शासनाच्या योजना समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचविणे; हा आमच्या राजकारणाचा मुख्य आधार आहे. सामाजिक कामांमधून जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा उंचावणे, समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधत गावाचा विकास साधने हेच आमच्या राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. अशी माहिती श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीचे गणेश अप्पा ढोरे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंढरीनाथ ढोरे यांनी दिली.

एमपीसी न्यूज’शी बोलताना  गणेश अप्पा  ढोरे म्हणाले, माजी मंत्री मदन बाफना यांच्या कारकिर्दीत मी पंचायत समितीच्या उपसभापती पदावर काम करत होतो. त्यावेळी कै. केशवराव ढोरे, सौ नंदाताई ढोरे, कै. लक्ष्मणराव धोंगडे वडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच असताना सर्वांच्या प्रयत्नातून वडगाव शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. शासनाच्या विविध योजना वडगावकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सर्वांनीच कंबर कसली होती. त्यातून आजच्या वडगावला गोंडस रूप मिळाले आहे.

वडगावच्या राबविलेल्या योजनांबद्दल सांगताना ढोरे म्हणाले, जाखमाता पाणी पुरवठा  योजना, तीन मजली जिल्हा परिषद शाळा, शासनाची पेयजल योजना राबविली. सुनील ढोरे यांनी बक्षीसपत्र करून स्वतःच्या मालकीची 10 गुंठे जागा ग्रामपंचायतीला दिली. याच जागेत तीन लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी उभारली. हरणेश्वर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एक लाख लिटर क्षमतेची टाकी उभारली. शिंदे टेकडी पाणीपुरवठा योजना राबविली. या विविध पाणीपुरवठा योजनांमुळे वडगाव शहराला अखंडितपणे पाणीपुरवठा होत आहे. पेयजल योजनेअंतर्गत शासनाकडून 4 कोटी 50 लाख रुपये मंजूर करून घेतले. त्यात गावक-यांच्या वतीने लोक वर्गणी 10%  (50 लाख रुपये) जमा केले आणि एकूण 5 कोटी रुपयांची ही योजना राबविण्यात आली आहे.

गावामध्ये अंतर्गत डांबरी, सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, भूमिगत गटारे, लाईट, स्मशानभूमीसाठी ‘भूखंड’ अल्पदरात मिळवून दिला. स्मशानभूमीचे संपूर्ण सुशोभीकरण केले. वडगाव मधील ऐतिहासीक तळ्याचे सुशोभीकरण केले. वडगाव हे मावळ तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची वडगाव मध्ये वर्दळ असते. वडगावच्या येणा-या सर्व नागरिकांचे स्वागत करणारी कमान उभारली. गावातील सर्व मंदिर उभारणी, सामाजिक कामे यांमध्ये वेळोवेळी सक्रिय सहभाग घेतला.

कातवीमध्ये पेयजल योजनेअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना राबविली. हायमॅक्स दिवे बसविले. शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक उपलब्ध करून देण्यात आले. तसेच कातवी गाव आणि परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. कातवी गावासाठी स्मशानभूमीसाठी महामार्गालगतची एक गुंठा जागा बक्षिसपात्र करून घेतली. त्यासाठी शासनाकडून निधी देखील मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर वडगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे हे स्मशानभूमीचे काम रखडले आहे. निवडणुका संपल्यानंतर लगेच हे काम हाती घेण्यात येणार आहे.

आजवर केलेल्या कामाचा आढावा घेत असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंढरीनाथ ढोरे म्हणाले, "कै. केशवराव ढोरे यांच्या प्रेरणेने समाजकारणात उतरत असताना त्यांचा राजकीय वारसा जोपासण्यासाठी नगरपंचायत निवडणूक लढवीत आहे. यापूर्वी वडगाव ग्रामपंचायत असताना, ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून शहरामध्ये विविध विकासकामे केली. इयत्ता पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा उभारली. दोन अंगणवाड्या नव्याने सुरु केल्या. व्यायामशाळा, महादजी शिंदे स्मारकाचे लायन्स क्लबच्या सहकार्याने शुशोभीकरण केले. 40 वर्ष रखडलेला मधुबन कॉलनी मधील रस्ता मार्गी लावला. शेतक-यांना शेती अवजारे, खते, बी-बियाणे मिळूवन देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. शेतीवर लक्ष केंद्रित करून मावळ तालुक्यातील सर्वोत्कृष्ठ ऊस उत्पादक पुरस्कार मिळविला.

केशवनगर, सांगवी,  राजपुरी, बेलज भागातील ग्रामस्थांना रेल्वे फाटकाचा मोठा अडथळा ठरत होता. नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग मंजूर करून घेतला. भयारि मार्गाचे काम जोरात सुरु आहे. ब्लॉक बनवून तयार आहेत. पाऊस संपल्यानंतर लगेच भुयारी मार्गाचे काम मार्गी लागणार आहे. मावळ तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी स्व. कै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सुरु केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम राबविला. मागील पाच वर्षात 65 जोडपी याअंतर्गत विवाहबद्ध झाली आहेत.ग्रामपंचायत सदस्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले.

मावळ तालुका खरेदी विक्री संघाचा उपाध्यक्ष म्हणून काम करताना, ना नफा ना तोटा या तत्वावर मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध इंद्रायणी तांदळाला बाजारपेठ मिळवून दिली. मागील काही दिवसांपूर्वी वडगाव ग्रामपंचायतीने सरसकट केलेली पाणीपट्टीतील वाढ ही वडगावकरांसाठी जीवघेणी होती. त्यामुळे गावक-यांना एकत्र करून विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. त्यामध्ये सरसकट पाणीपट्टी न घेता नळजोडणी प्रमाणे पाणीपट्टी घेण्याचा ठराव केला. यामुळे वडगावकरांवरील मोठे संकट टळले आहे.

नवीन योजना घेऊन नागरिकांना येणा-या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कटिबद्ध राहण्याचे आश्वासन पंढरीनाथ ढोरे यांनी यावेळी दिले.
येत्या पाच वर्षात करण्यात येणारी ठोस कामे –
# भव्य क्रीडासंकुल
# ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क
# महिला आणि लहान मुलांसाठी उद्याने
# भाजी मंडईचे शुशोभीकरण
# पोटोबा मंदिरासमोरील ओढ्यावर पाईप लाईन टाकून बंदिस्त ओढा करणे
# वाचनालय
# प्राथमिक आरोग्य केंद्र
# भव्य वाहनतळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.