Hadapsar : मैदानात खेळत असणारी सहा मुले गायब!

एमपीसी न्यूज – पुण्यातील हडपसर येथून मैदानात खेळत असणारी सहा मुले गायब झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या बाबतीत वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3 जुलै) घडली.

सहमद आसार उद्दीन रजा (13, बिहार), अन्नान महंम्मद आजाद शेख (12), अहसान निजाम शेख (15), शाहनवाज जमालुउद्दीन शेख (16), अन्वारुल इसराइल हक (13) आणि रिजवान आलम सलमुद्दीन शेख (15) अशी गायब झालेल्या मुलांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, गायब झालेल्या मुलांचे वय १२ ते १६ वर्षे आहे. ते मूळचे बिहारचे होते. ते मदारशात राहत होते. ते त्यांच्या घरी गेले असल्याचा संशय पोलिसांना आहे. वानवडी पोलीस तपास करीत आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.