Vadgaon Maval : बळीराजा उभा ठाकला बळीराजासाठी

पंढरीनाथ ढोरे यांचा प्रचारदौरा बळीराजाच्या दारी 
 
एमपीसी न्यूज – वडगाव कातवी नगरपंचायत पहिली सार्वत्रिक निवडणूक अवघ्या सहा दिवसांवर आली आहे. सर्व उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांशी संपर्क करीत आहे. श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंढरीनाथ ढोरे देखील प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. आज (सोमवारी) त्यांनी शेतकरी मतदारांच्या भेटी घेतल्या. 

 
पंढरीनाथ ढोरे हे स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत. यापूर्वी मावळ तालुका खरेदी विक्री संघामध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना त्यांनी शेतक-यांना शेती अवजारे, खते, बी-बियाणे मिळूवन देण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला आहे. शेतीवर लक्ष केंद्रित करून मावळ तालुक्यातील सर्वोत्कृष्ठ ऊस उत्पादक पुरस्कार मिळविला आहे. शेतक-यांचा मोठा समुदाय त्यांच्या पाठीशी आहे. पंढरीनाथ ढोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह बळीराजानेक देखील पंढरीनाथ यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. 
 
पंढरीनाथ ढोरे म्हणाले, आजवर शेतक-यांच्या हाकेला साद देत वेळोवेळी त्यांना मदत केली आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान शेतक-यांकडून पाठिंब्याची थाप मिळत आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी पुढील काळात आग्रही राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.