Vadgaon Maval : वडगाव कातवी नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात

श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीच्या वतीने प्रचाफेरीचे आयोजन 
एमपीसी न्यूज – वडगाव कातवी पहिली नगरपंचायत निवडणूक येत्या 15 जुलै रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व अपक्ष पुरस्कृत श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीच्या वतीने गावातील प्रत्येकापर्यंत पोहोचून प्रचार केला जात आहे.

सर्व पक्षांकडून सर्व माध्यमांमधून प्रचार केला जात आहे. आजवर केलेली कामे, जनतेने संधी दिल्यास येत्या पाच वर्षात करण्याची कामे याच्या जोरावर लोकांशी संवाद साधला जात आहे. श्री पोटोबा महाराज नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंढरीनाथ ढोरे नगरपंचायत परिसरात फिरून प्रचार करीत आहेत. आज (रविवारी) सकाळी प्रभाग क्रमांक 2, 8 आणि 11 मध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीमध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत लोकांसाठी अहोरात्र कष्ट करणे, विविध प्रश्न मार्गी लावणे आणि शासनाच्या योजना समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचविणे; हा आमच्या राजकारणाचा मुख्य आधार आहे. सामाजिक कामांमधून जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा उंचावणे, समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधत गावाचा विकास साधने हेच आमच्या राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. असे पंढरीनाथ ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.