Pavana Dam Update : खुशखबर! पवना धरणात 50 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील (Pavana Dam Update) पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणात 50.04 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील चार दिवसात धरणातील साठ्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकर, मावळवासीयांची पाण्याची चिंता कमी झाली आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील साडे तीन वर्षांपासून शहरवासीय दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. त्यातच जुन, संपला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले होते.

Pimpri : महापालिका अग्निशामक दल, पोलिसांची ‘पूर बचाव चाचणी’

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने आठ दिवस (Pavana Dam Update) विश्रांती घेतली होती. सोमवारपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. पवना धरण क्षेत्रात चार दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

मागील आठ दिवसात धरणातील साठ्यात 15 टक्यांनी वाढ झाली आहे. आजमितीला धरणात 50.04 टक्के पाणीसाठा असून धरण अर्धे भरले आहे. तर, 1 जूनपासून आजपर्यंत 1099 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. आजदिवसभरात 29 मिली मीटर पावसाची नोंद झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.