Pavana Dam: पवना धरण परिसरात 24 तासात 147 मिली मीटर पाऊस

धरणातील साठा 50.97 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील चोवीस तासात 147 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (Pavana Dam) त्यामुळे धरणातील पाणीसाठा 8.79 टक्क्यांनी वाढला असून धरणात एकूण 50.97 टक्के पाणीसाठा आहे.

 

 

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. (Pavana Dam) शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

 

 

गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 147 मि.मि.

1 जूनपासून झालेला पाऊस = 1,119 मि.मि.गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 632 मि.मि.

धरणातील सध्याचा पाणीसाठा = 50.97 टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 33.94 टक्के

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 8.79 टक्के

1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 34.13 टक्के

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.