Free Booster Dose: बूस्टर डोस घ्यायचाय, येत्या शुक्रवारपासून महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर मोफत मिळणार!

एमपीसी न्यूज: कोरोना लसीचा बूस्टर डोस 15 जुलैपासून म्हणजेच येत्या शुक्रवारपासून 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना मोफत दिला जाणार आहे. (Free Booster Dose) केंद्र सरकारने नुकतीच याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस हे बूस्टर डोस मोफत मिळणार आहेत.

 

पुणे शहरात 18 ते 59 यावर्षी वयोगटातील पावणे चार लाख नागरिक पात्र आहेत. या सर्व नागरिकांना शहरातील महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रावर शुक्रवारपासून हा डोस मोफत मिळू शकणार आहे. पालिकेच्या लसीकरण केंद्रावर किंवा कोविड अँप वर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही नागरिकांना ही लस घेता येणार आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्षिन लस्सींचे डोस या केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Pavana Dam: पवना धरण परिसरात 24 तासात 147 मिली मीटर पाऊस

 

 

यापूर्वी बूस्टर डोस हा हेल्थकेअर वर्कर फ्रंट लाईन वर्कर यांनाच मोफत दिला जात होता. इतरांना मात्र यासाठी पैसे मोजावे लागत होते.(Free Booster Dose)  मात्र शुक्रवारपासून सर्वांसाठी हा डोस मोफत दिला जाणार आहे. पुणे शहरात आतापर्यंत 38 लाख लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर अठरा वर्षांपुढील पाच लाख 24 हजार 492 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर तीन लाख 86 हजार नागरिकांचा तिसरा डोस घेणे बाकी आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.