PCMC : जनसंवाद सभेच्या वेळेत बदल

एमपीसी न्यूज – दिवाळीतील विविध सार्वजनिक सुट्ट्यांमुळे सर्व क्षेत्रीय (PCMC)कार्यालयांमध्ये होणा-या जनसंवाद सभेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये महिन्यातील दुस-या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र दिवाळी सणानिमित्त घोषित करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्या विचारात घेता या महिन्यात होणा-या जनसंवाद सभेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

Chakan : चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले; एकाला अटक

सोमवार 13 नोव्हेंबर रोजी जनसंवाद सभा होणार नसून या (PCMC)महिन्यातील जनसंवाद सभा सोमवार 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत होणार आहे. झालेल्या या बदलाची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.