Thergaon :चुलत भावाकडून अंगावर गाडी घालून व कोयत्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्युज – चुलत भावाच्या अंगावर गाडी घालून व कोयता फेकून (Thergaon)मारून जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9) थेरगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी अभिजीत (Thergaon)शिवाजी बारणे (वय 33 रा. थेरगाव) याला अटक केली आहे.याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात विनोद रमेश बारणे (वय 33 रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयएसडीएस’च्या कामाला चालना!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काही कारण नसताना फिर्यादी यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना खाली पा डले. यात फिर्यादी जखमी झाले.याबाबत जॉब विचारला असता आरोपीने त्याच्या गाडीतून काढून आरोपीच्या अंगावर फेकला. तो कोयता अडवताना फिर्यादी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.