Chakan : चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले; एकाला अटक

एमपीसी न्यूज – चाकूचा धाक दाखवून तिघांनी चार मित्रांना (Chakan) लुटले. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.10) रात्री खेड तालुक्यातील वाकी येथे घडली.

याप्रकरणी अरुण नारायण धोत्रे (वय 21 रा. शिरवली खेड) याला अटक केली आहे तर कृष्णा तिडके व सचिन पांडुरंग वखरे (नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

चाकण पोलीस ठाण्यात लखन शांतीलाल कणसे (वय 28 रा. वाकी) यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयएसडीएस’च्या कामाला चालना!

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार,फिर्यादी व त्यांचे दोन मित्र हे त्यांच्या रूम मध्ये गप्पा मारत बसले असताना आरोपी रूम मध्ये घुसले. त्यांनी फिर्यादी व इतरांना अंगावर लाल मिरची पावडर टाकून तसेच हिटरने मारहाण केली.

चाकूचा धाक दाखवून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांचे मोबाईल (Chakan) व गाड्या चोरून नेल्या.यावरून चाकण पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.