Pimpri : ‘स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी शॉर्ट व्हिडीओ/रील स्पर्धा, ‘इतकी’ आहेत बक्षीसे

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत “स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी” अभियान (Pimpri)राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नागरिकांनी सिंगल युज प्लास्टीकचा वापर टाळून, स्वच्छ व प्रदुषण टाळणे, पर्यावरण पुरक स्थानिक उत्पादनांचा वापर करुन दिवाळी साजरी करावी, यासाठी 30 सेकंदांचा शॉर्ट व्हिडीओ/रील बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धा फक्त ‍पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामधील नागरिकांसाठी (Pimpri)आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले जाईल. प्रथम, द्वितीय व तृतीय स्तरावर प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देण्यात येईल. बक्षिसांची संख्या 30 असून रक्कम 22 हजार रुपये आहे. प्रथम क्रमांकाची 10 बक्षीससे आणि प्रत्येकी 1 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाची 10 बक्षीससे आणि प्रत्येकी 700 रुपये आणि तृतीय क्रमांकाची 500 रुपयांची 10 बक्षीससे असणार आहेत.

Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयएसडीएस’च्या कामाला चालना!

स्पर्धेचे निकष असून या निकषांचा वापर करुन शॉर्ट व्हिडीओ/ रील बनविण्यात यावेत. फुलांच्या रांगोळीचा वापर, RRR सेंटरवर निरूपयोगी साहित्य दान करणे. सिंगल युज प्लास्टीकचा वापर टाळणे. दिवाळी साजरी करताना पर्यावरण पूरक (Eco friendly) साहित्यांचा वापर करणे. दिवाळी भेटवस्तू देताना सिंगल युज प्लास्टीकचा वापर न करता पर्यावरण पूरक (Eco friendly) साहित्य भेटवस्तू म्हणून देणे, प्रदुषण टाळत दिवाळी साजरी करणे, प्लास्टिक फ्री शॉपिंग, Eco friendly साहित्यापासून बनविलेले आकाश कंदील वापरणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे.

स्पर्धेसाठी वयाची अट नाही. स्पर्धक पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असावा. शॉर्ट व्हिडीओ/रील हा नाविन्यपुर्ण (creative) असावा. शॉर्ट व्हिडीओ/रील बनवून #SwachhDiwali या हॅशटॅगचा वापर करुन सोशल मिडियावर पोस्ट करणे तसेच @sbmurbangov आणि @pcmcindiagovin या ट्विटर व इन्स्टाग्राम हँडलला टॅग करणे अनिवार्य आहे.

तसे नसल्यास सदर शॉर्ट व्हिडीओ/रील स्पर्धेसाठी विचारात घेतली जाणार नाही. सर्व निकष एकत्रितरित्या पुर्ण करणाऱ्या शॉर्ट व्हिडीओ/रील ला प्राधान्य दिले जाईल. स्पर्धेत सहभागी होणा-या स्पर्धकांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल व बनविलेला शॉर्ट व्हिडीओ/रील [email protected] या ई-मेल आय-डी वर 15 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठविण्यात यावा. यानंतर येणारे शॉर्ट व्हिडीओ/रील विचारात घेतले जाणार नाही.

 

निवड प्रक्रियेबाबत समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील. अटी-शर्ती ठरवि‍णे, त्यामध्ये बदल करण्याचा अधि‍कार आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांना राहतील. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना स्वच्छ दिवाळी-शुभ दिवाळी या अभियानांतर्गत शॉर्ट व्हिडीओ/रील बनविणेचे स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डांगे यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.