PCMC Diwali Pahat : महापालिकेतर्फे शनिवारी दिवाळी पहाटचे आयोजन

एमपीसी न्यूज –  ‍पिंपरी-चिंचवड महापालिका व संगीत अकादमी (क्रीडा विभाग) यांच्यावतीने शहरवासीयांसाठी दिपावली पहाट – 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (PCMC Diwali Pahat) शनिवार (दि. 22) ऑक्टोबर रोजी सकाळी 5.30 वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह याठिकाणी कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती क्रीडा विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली.

दिपावली पहाट कार्यक्रमामध्ये सुप्रसिध्द शास्त्रीय गायक पंडित जयतीर्थ मेऊंडी व सुप्रसिध्द गायिका विदुषी गौरी पाठारे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार असून सुप्रसिध्दी बासरी वादक पंडित रोणु मुजुमदार हे बासरी वादनाचा कार्यक्रम सादर करतील. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह (PCMC Diwali Pahat) यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

Diwali Exhibition : दिवाळी साहित्य, गृहउपयोगी ‘वस्तुंच्या प्रदर्शन विक्री महोत्सवाच्या समारोपाला खासदार सुप्रिया सुळे यांची सदिच्छा भेट

नक्षत्रांची उधळण आणि नवस्वप्नांची पखरण करण्याकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी दिपावली पहाट कार्यक्रमासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन उपायुक्त जोशी यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.